जळगाव ( प्रतिनिधी ) – हरीविठ्ठल नगरात दुचाकीला मध्यरात्री अचानक आग लागल्याने नुकसान झाले आग नेमकी कश्यामुळे लागली हे स्पष्ट झालेले नाही. रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
शिवाजी मुरलीधर बारी (वय-४८) हरीविठ्ठल नगरात कुटुंबियांसह राहतात. त्यांच्याकडे (एमएच १९ बीपी ३८२३) क्रमांकाची दुचाकी आहे. २ नोव्हेबर रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास सर्व झोपलेले असतांना अंगणात लावलेल्या दुचाकीने अचानक पेट घेतला. शिवाजी बारी यांनी रामानंद नगर पोलीसांना माहिती दिली. रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो ना जितेंद्र तावडे करीत आहेत.