जळगाव ( प्रतिनिधी ) – यावल तालुक्यातील दहिगाव येथे आजाराला कंटाळून ७८ वर्षीय वृद्धाने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
दहिगाव येथील रहिवासी निंबा चिंतामण माळी हे आजाराने त्रस्त होते. आजाराला कंटाळून त्यांनी सोमवारी सुमनबाई पाटील यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मृतदेह विहिरीतून काढून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला.
डॉ.बी.बी.बारेला यांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवला. यावल पोलिसांत भिकन माळी यांच्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तपास हवालदार सिकंदर तडवी, अनिल साळुंके करत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.