जळगाव ;- तालुक्यातील कुसुंबा गावात अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या तिघांवर पोलीसांनी धाड टाकत पत्ते, जुगाराची साधने व साहित्य जप्त केले. तिघांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , माहिती अशी की, तालुक्यातील कुसुंबा येथील देवा सायकल मार्टजवळ बेकायदेशीर पत्त्याचा झन्ना मन्ना जुगार खेळत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी रविवारी १९ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास कारवाई करत संशयित आरोपी एकनाथ रामा कोळी (वय-३२), सुभाष श्रीपद दांडगे, (वय-४२), किशोर सुकदेव हटकर (वय-३८) सर्व रा. कसूबा ता.जि. जळगाव यांना ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यातील पत्ते, जुगाराची साधने व साहित्य असा ५७० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी पोकॉ निलेश पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.