जळगाव ( प्रतिनिधी ) – मोहाडी रोड परिसरात विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मोहाडी रोड परिसरात एकजण कंबरेला पिस्तूल लावून फिरत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज कारवाई करत संशयित आरोपी विकी महेंद्र कोळी (वय-२० , रा. समता नगर) याला ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता कमरेला २० हजार रूपये किंमतीचे गावठी पिस्तूल आढळून आले. पिस्तूल हस्तगत करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो ना किशोर राठोड यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पो.ना. रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख, पो.कॉ. ईश्वर पाटील यांनी ही कारवाई केली.