रावेर ( प्रतिनिधी ) – रावेर तालुक्यातील चोरवड चेक पोस्टवर आरटीओच्या सतर्कतेने गुरांची वाहतूक करणारा ट्रक पकडला. चालक ट्रक सोडून पसार झाला असून २० गुरांची सुटका करण्यात आली आहे.
रावेर तालुक्यातील चोरवड येथील आरटीओ चेकपोस्ट मध्यप्रदेशातून आलेला ट्रक (युपी ७५ एम ११०) वरील चालकाने कागदपत्राची तपासणीसाठी उतरला. त्याच्या हालचालीवरुन आरटीओ निरिक्षक आर.डी.निमसे यांना शंका आली. मात्र कागदपत्रे तपासणी न करता ट्रक सोडून पसार झाला. दरम्यान गस्तीवर असलेले सहाय्यक फौजदार विशाल सोनवणे, पो.नाईक महेंद्र सुरवाडे, काँ सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, प्रदिप सपकाळे, श्रीराम कांगणे या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. ट्रक ताब्यात घेवून ट्रकमध्ये कोंबून भरलेली २० जनावरांची सुटका करण्यात आली. सर्व गुरांना जळगावातील गौशाळेत रवाना करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.