जळगाव ( प्रतिनिधी ) – अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील शिक्षणोत्तेजक मंडळाच्या आदर्श हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीसाठी व वैयक्तिक मान्यतेसाठी या शाळेतील शिक्षक संदीप शिरसाठ यांनी आजपासून माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत सहकुटुंब उपोषण सुरु केले आहे .
आदर्श हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातील कुटुंबासह उपोषणास बसलेले शिक्षक संदीप शिरसाठ यांचे म्हणणे आहे की या संस्थेत संचालकांनी मनमानी कारभार सुरु केलेला आहे या शाळेत त्यांची ५ फेब्रुवारी २०१४ रोजी शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती झाली होती . संस्थेने १५ नोव्हेंबर २०१४ रोजी माझ्या वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी महाजन यांच्याकडे पाठवला होता मात्र त्यास मान्यता मिळाली नव्हती त्यानंतर मी नाशिकच्या शिक्षण उप संचालकांकडे तक्रार दाखल केली होती त्यावरून ३१ जुलै २०१८ रोजी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी माझ्या मान्यतेस हरकत नसल्याचे पत्र माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते त्यानंतर या संस्थेने बोगस पद भरती केलेल्या शिक्षकांना २०१६-१७ या वर्षात मान्यता मिळालेल्या आहेत शिपायांचीही ३ पदे बेकायदा भरलेली असली तरी त्यांना मान्यता मिळालेली आहे
या सगळ्या अनागोंदीच्या तक्रारी मी शिक्षण उपसंचालक , शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक , शिक्षण सचिव , अप्पर जिल्हाधिकारी , प्रांताधिकारी , जिल्हा परिषदेची शिक्षण व अर्थ समितीकडे तक्रारी दाखल करूनही काहीच कार्यवाही झालेली नाही , असे संदीप शिरसाठ यांचे म्हणणे आहे.