जळगाव ( प्रतिनिधी ) – धार ते कवठळ शिवरस्त्याची दुरावस्था झाली होती. धारच्या ग्रामस्थांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांना या शिवरस्त्याची दुरावस्था सांगितली होती. जि प सदस्य प्रताप पाटील धार येथे द्वारदर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांसोबत चिखल तुडवत रस्त्याची पाहणी केली.
रस्त्याचे दुरुस्तीचे काम 8 दिवसात सुरू करण्याचे आश्वासन जि प सदस्य प्रताप पाटील यांनी धारवासीयांना दिले. यावेळी नारायण बोरसे, दिपक पाटील, सुभाष पाटील, रविंद्र पाटील, माधव पाटील, धनराज पाटील, ज्ञानेश्वर पाटील, दिनेश पाटील, प्रताप पाटील, अंकुश पाटील, अमोल पाटील, ललित पाटील, सौरभ पाटील, दीपक साबळे व ग्रामस्थ उपस्थित होते.