नाशिक ( प्रतिनिधी )- आयकर विभागाने कांदा व्यापाऱ्यावर छापा टाकून 25 कोटी रुपये जप्त केले . या व्यापाऱ्याकडे 3 दिवसापासून आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. एवढे रुपये मोजण्यासाठी अनेक तास लागले आयकर चुकविणाऱ्या व्यापाऱ्यांकडे ही धाड टाकल्याचे सांगितले जात आहे.
यामध्ये काही कांद्याचे तर काही द्राक्षाचे व्यापारी आहेत. व्यापाऱ्यांनी 100 कोटी रुपये आयकर चुकविल्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्यापाऱ्यांकडून 25 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. नाशिक देशातील सर्वात मोठा कांदाबाजार आहे. काही दिवसांपासून कांद्याचे भाव वाढले आहे. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे कांदा व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.