पुणे ( वृत्तसंस्था ) – बारामती तालुक्यातील पारवडी येथे सावत्र बापानेच मुलाचा कोयत्याने वार करून खून केला मारुती साधुराम जाधव असे या आरोपीचे नाव आहे. गोपीनाथ जाधव असे या मयत झालेल्या मुलाचे नाव आहे.
पारवडी गावाची येथे आरोपी मारुती जाधव मजुरीचे काम करायचा. त्याचे गोपीनाथशी घरगुती कारणावरून भांडण झाले. रागाच्या भरात त्याने मुलाच्या डोक्यावर कोयत्याने वार करून खून केला आणि पसार झाला. लोकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. आरोपीला शोधणे अवघड होते. कारण आरोपीकडे मोबाईल नव्हता.आणि त्याला कोणतेही नातेवाईक नसल्याने त्याचा फोटोदेखील नव्हता. गुन्हेशोध पथकाने पोलीस निरीक्षक ढवाण यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या क्षेत्रात शोधमोहीम राबवून 3 तासानंतर झाडीत लपून बसलेल्या आरोपीला अटक करण्यात यश मिळवले .