नराधम पिता पोलिसांच्या ताब्यात
भुसावळ ( प्रतिनिधी ) – बाप -लेकीच्या नात्याला कलंक लावणारी घटना भुसावळात घडली. आपल्या 16 वर्षीय मुलीवरच पित्याने तीन वर्षांपासून अत्याचार केला मात्र छळ असह्य झाल्याने अत्याचाराला वाचा फुटली नराधम पित्याविरोधात पीडीतेने भुसावळ बाजारपेठ पोलिसात तक्रार नोंदवल्याने पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 41 वर्षीय आरोपी पित्याला अटक करण्यात आली.
शहरात पीडीता वडिल व आत्या व भावासह राहते. पीडीतेच्या आईचे 13 वर्षांपूर्वीच निधन झाल्याने आत्यानेच पीडीतेचा सांभाळ केला.पीडीतेच्या 41 वर्षीय पित्याने शनिवारी पहाटे अडीच वाजेदरम्यान पीडीतेवर पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याने पीडीतेने विरोध करीत बाजारपेठ पोलीस ठाणे गाठले पोलिसांकडे अत्याचाराची कैफियत मांडली. पो नि दिलीप भागवत यांनी पीडीतेचे म्हणणे ऐकून घेत गुन्हा दाखल करून आरोपीला शनिवारी अटक केली. पीडीतेच्या तक्रारीनुसार, तीन वर्षांपासून पित्याकडून अत्याचार सुरू होता घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली जात होती, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व निरीक्षक भागवत यांनी घटनास्थळी पाहणी केली.
आरोपीविरोधात भुसावळ बाजार पेठ पोलिसात भाग 5, गुरनं भादविं कलम 376 (3), 506 व बालकांचे लैंगिक अपराधांपासुन संरक्षण अधिनियम 2012 चे कलम-6 प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व बाजारपेठ पो नि दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठचे नाईक विकास सातदिवे, निलेश चौधरी, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, योगेश माळी, जावेद शहा, जाफर शेख आदींच्या पथकाने अटक केली. तपास पो नि दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक .निरीक्षक मंगेश गोंटला, गजानन वाघ करीत आहेत.