जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला उत्कृष्ट कामगिरीसाठी बँकिंग फ्रंटीअर संघटनेकडून दोन श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाले आहेत
बँकिंग फ्रंटीअर संघटनेतर्फे आज ऑनलाईन झालेल्या फ्रंटियर्स इन को ऑपरेटीव्ह बॅंक्स अवॉर्ड्स – २०२१ या कार्यक्रमात जळगाव जिल्हा बँकेला सर्व जिल्हा बँकांमधून पहिला बेस्ट डिजिटल बँक आणि दुसरा वुमन लीडर ऑफ दि इयर ( चेअरपर्सन ) या दोन श्रेणीमध्ये पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे-खेवलकर यांना वुमन लीडर ऑफ दि इयर ( चेअरपर्सन ) हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या नेतृत्वातील संचालक मंडळाने बँकेचा तोटा भरून काढण्याची लक्षवेधी कामगिरी केली आहे
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु असतानाच बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे-खेवलकर यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने आता त्यांचे विरोधक काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.