जळगाव ( प्रतिनिधी ) – आता जिल्हा बँकेचा पहिला चेअरमन राष्ट्रवादीचाच असेल सध्या दोन जणांची नावे स्पर्धेत व चर्चेत आहेत ती आताच सांगणार नाही असे सांगत माजी मंत्री सतीश पाटील यांनी बिनविरोध निवडून आलेले संचालक संजय पवार यांनी गुलाबराव देवकर यांचे नाव घेत मांडलेली भूमिका काही चुकीची नाही असे स्पष्ट केलं व गुलाबराव देवकरांकडे अंगुलीनिर्देश करून राजकारणातल्या जाणकारांना कामाला लावले आहे .
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांच्या पत्रपरिषदेत आज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अँड रवींद्रभैय्या पाटील , माजी मंत्री गुलाबराव देवकर , आमदार अनिल भाईदास पाटील , प्रदेश सचिव वंदना चौघरी , जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे – खेवलकर , महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी , वाल्मिक पाटील , अँड सचिन पाटील आदी उपस्थित होते.
जळगाव लोकसभा मतदारसंघात ७० टक्के लोकांनी खासदार उन्मेष पाटलांचे तोंडही पाहिलेले नाही , हा माझा आरोप नाही , हे वास्तव आहे असा खासदारांच्या वर्मी घाव घालत आज माजी मंत्री सतीश पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी या खासदाराने काहीतरी तरी त्यांनी केले असेल तर ते सांगावे असे जाहीर आव्हानच दिले . खासदारांना आज जणू त्यांनी ठरवून घेरले आणि उगाच शेतकरी हिताचा खोटा कळवळा त्यांनी दाखवू नये असे दणकेही दिले !
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांच्या पत्रपरिषदेत आज सतीश पाटील या मुद्द्यावर आवर्जून बोलले . ते पुढे म्हणाले की , जिल्ह्यातील शेतकरी कोरोनाच्या त्रासात , अतिवृष्टी व दुष्काळाच्या त्रासात अडकला मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी या खासदाराने लोकसभेत ब्र शब्द काढला नाही , वादळ आणि अतिवृष्टीच्या संकटात राज्य सरकार अडचणीत असूनही आमचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना विश्वासात घेऊन , आश्वस्त करीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या मदतीचे पॅकेज देण्याचा सल्ला दिला राज्याला केंद्राकडून मदत मिळावी म्हणून राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वपक्षीय खासदारांनी दिल्लीत आवाज उठवावा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनीसुद्धा केले होते . शेतकरी संकटात सापडल्याने आम्हालाही खासदार उन्मेष पाटलांकडून अशीच अपेक्षा होती आता त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेल्या विमा नुकसान भरपाईचे श्रेय घेत आकडेवारी जाहीर केली आहे मात्र तीही अत्यंत हास्यास्पद आहे जळगाव शहरात स्वच्छता , रस्ते , आरोग्य , पाणी हे प्रश्न आहेतच आमदार राजूमामा भोळे यांच्याही ताब्यात ही महापालिका होती राज्यात त्याच्या पक्षाचे सरकार सत्तेवर होते मात्र त्यांनाही काही केले नाही जिल्ह्यातील भाजपनेत्यांचे चेलेचपाटे बीएचआर घोटाळ्यात अडकलेले आहेत या घोटाळ्यातील भाजपनेत्यांचीच भूमिका संशयास्पद आहे या नेत्यांनी किती संस्थांची वाट लावली हे जाहीरपणे सांगावे आणि आता त्यांचा डोळा जिल्हा बँकेवर आहे . म्हणून ते आमच्यावर आरोप करीत आहेत गेल्या वेळी नाथाभाऊंनी सर्वपक्षीय पॅनल तयार करून सर्वांना संधी देत प्रभावीपणे काम करून दाखवले त्यावेळी ते भाजपमध्ये होते मात्र त्यांना कामाची तळमळ आहे म्हणून बँक मोठा तोटा भरून काढू शकली , असेही ते म्हणाले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला किती जागा मिळतील ? या प्रश्नाच्या उत्तरात माजी मंत्री सतीश पाटील यांनी माझा विश्वास हेच भविष्य आल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही टोला लगावला . अंदाज घेण्यासाठी मी ज्योतिषाकडे जाणार नाही काही लोक हेलिकॉप्टरने ज्योतिषाकडे जातात , असेही ते म्हणाले.