नाशिक ( प्रतिनिधी ) – ओळखीचा गैरफायदा घेत महिला डॉक्टरचे नको त्या अवस्थेत फोटो काढले. ते फोटो पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी दिली नाशिक सायबर पोलिसात संशयीत राजेश कपीलदेव सिंग (अश्विननगर – नाशिक) याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पिडीत महिला डॉक्टरचे संशयित राजेश सिंग याच्यासोबत चांगले संबंध होते. त्याचे महिला डॉक्टरकडे नेहमी येणे जाणे होते. त्यातून त्यांच्यात सहवास वाढला व नंतर प्रेम निर्माण झाले. या संधीचा फायदा घेत राजेश सिंग याने महिला डॉक्टरचे नको त्या अवस्थेत फोटो काढले.
कालांतराने तो तिला भेटण्याचा सारखा तगादा लावत असल्यामुळे तिने नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या राजेशने तिचे फोटो आणि व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी दिली. सायबर पोलिसात पिडीत महिला डॉक्टरने राजेश सिंग विरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरु आहे.