जळगाव ( प्रतिनिधी ) – मेहरूण तलावाच्या परिसरात फिरत असलेल्या एका विवाहितेची अत्यंत उदासिन मनस्थिती वेळीच व गाम्भीर्याने लक्षात घेऊन जळगाव एमआयडीसी पोलिसांनी तिला आत्महत्येच्या निर्णयापासून पराव्रुत्त केले. व तिचे आणि सोबत असलेल्या तिच्या पाच वर्षाच्या मुलीचे ही प्राण वाचवले .
जळगाव शहरातील नाथ वाडा परिसरातील एका महिलेने मेहरुन तलाव येथे सकाळी दहा वाजेच्या सुमारास आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी असलेले पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे , श्रीराम बोरसे, विश्वास बोरसे, जितेंद्र राजपूत , महिला पोलीस अमलदार मीनाक्षी घेटे , विनिता राजपूत यांनी तिची समजूत काढून तिला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. तिच्याबरोबर तिची पाच वर्षाची मुलगी होती. जळगाव एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या या लाख मोलाच्या कामाचे नाथवाडा परिसरातील नागरिकांनसह वरिष्ठ पोलीस अधिका-यांनीही कौतुक केले आहे.