जळगाव ( प्रतिनिधी ) – भजे गल्लीत पायी जाणाऱ्या मजूराच्या खिशातील १२ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात दोन भामट्यांनी काढून पळ काढल्याची घटना मंगळवारी घडली. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अविनाश रामदास खैरनार (वय-५० , रा. प्रतापनगर जिल्हापेठ ) हे हातमजूरी करून उदरनिर्वाह करतात. ते मंगळवारी रात्री नविन बसस्थानकाजवळील भजे गल्लीतून पायी जात असतांना त्याच्या मागून येवून दोन जणांनी त्यांच्या खिश्यातील १२ हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरी काढून चोरून पळ काढला . त्यांनी आरडाओरड केली परंतू तोपर्यंत दोन्ही भामटे पसार झाले होते. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो ना शरीफ शेख करीत आहे.