नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – दुसऱ्या बायकोचा खून करून तिचा मृतदेह बॅगमध्ये भरल्यानंतर तिच्यापासून झालेल्या ११ महिन्यांच्या निरागस मुलाला बेवारस अवस्थेत एका गोशाळेच्या गेटवर सोडून फरार झालेल्या आरोपीला शोधण्यात गुजरातेतील गांधीनगर पोलिसांना यश आले आहे.
शुक्रवारी गुजरातच्या गांधीनगर येथे एका ११ महिन्याच्या गोड चिमुकल्याला एका व्यक्तीने रस्त्यावर सोडून दिल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर ही घटना पोलिसांनपर्यंत पोहचली पोलीस चिमुकल्याच्या नातेवाईकांचा शोध घेत होते.
ज्या व्यक्तीने या मुलाला रस्त्यावर सोडून पळ काढला होता त्या व्यक्तीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. घडलेला प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असल्यामुळे या व्यक्तीपर्यंत पोहोचणं पोलिसांना सोपं झालं व अखेर या व्यक्तीचा शोध लागला.
या व्यक्तीचं नाव सचिन दीक्षित आहे व सचिनचाच हा मुलगा असल्याचेही त्याने कबुल केले आहे. १५० सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर अखेर सचिनला शोधण्यात पोलिसांना यश आलं. सचिनच्या घरापर्यंत पोलिसांनी शोध घेतला, मात्र त्याच्या घराला कुलूप होते. त्यांना सचिनचा फोन नंबर मिळाला. लोकेशन ट्रेस करून सचिनला शोधण्यात यश आले.
या चिमुकल्याच नाव शिवांश आहे. पोलीस सचिनच्या घरी पोहचले तेव्हा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांना बॅगेत महिलेचा मृतदेह आढळला. सचिनची चौकशी केली गुजरातच्या गांधीनगरमध्ये सचिन एका कंपनीत कामाला होता. ४ वर्षापूर्वी त्याने घरच्यांच्या सांगण्यावरुन अनुराधासोबत लग्न केले. त्याला ३ वर्षाचा मुलगा आहे. २०१८ मध्ये सचिनची भेट हिना नावाच्या मुलीसोबत झाली. या दोघांमध्ये मैत्री आणि त्यानंतर प्रेम झालं. दोघंही एकाच फ्लॅटवर भाड्याने राहत होते. सचिन आठवड्याचे ५ दिवस वडोदरा इथं हिनासोबत राहायचा तर २ दिवस अहमदाबादमध्ये कुटुंबाला भेटायला यायचा. डिसेंबर २०२० मध्ये हिनाने एका मुलाला जन्म दिला. दोघांनीही लग्न केले नव्हते. लग्नासाठी हिना नेहमी सचिनवर दबाव टाकायची. ८ ऑक्टोबरला सचिन आणि हिना यांच्यात भांडण झालं.
रागाच्या भरात सचिनने हिनाचा गळा आवळून खून केला. हिनाच्या मृत्यूनंतर त्याने घरातील सुटकेसमध्ये तिचा मृतदेह ठेवला आणि शिवांशला घेऊन गांधीनगरला जाऊन गौशाळेबाहेर गेटवर ठेवले. त्यानंतर पोलिसांच्या संपूर्ण प्रकार लक्षात आला गांधीनगर पोलिसांनी परिसरातील ८५ पोलिसांच्या १४ विविध टीम्स बनवल्या. व त्यामुळे सचिनचा शोध लागला. अनेकांनी या मुलाला दत्तक घेण्याची तयारी दाखवली आहे.