जळगाव ( प्रतिनिधी ) – राज्याचे इ – फेरफार प्रकल्पाचे समन्वयक उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी महसूल खात्यातील कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना उद्देशून अर्वाच्य भाषेत केलेल्या विधानाच्या निषेधार्थ आज राज्यभर तलाठी संघाने आंदोलन पुकारले आहे . जळगाव तालुका तलाठी संघानेही आज तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करीत धरणे आंदोलन केले आणि त्यांच्या संन्व्याक पदावरून बदलीची मागणी राज्य सरकारकडे केली

तलाठी कर्मचाऱ्यांसोबत मंडल अधिकारीही या आंदोलनात सहभागी झाले होते या आंदोलनाचा आज दुसरा टप्पा होता . तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष शशिकांत नेरकर , कार्याध्यक्ष मनोज सोनवणे , जिल्हा प्रतिनिधी रुपेश ठाकूर , रामेश्वर जाधव , वीरेंद्र पालवे , के आर सरोदे , राजकला घायवट ,अनिता झाल्टे, मनीषा माने , चंद्रकांत किनगे , रवींद्र घुले , ज्ञानेश्वर माळी , रमेश वंजारी आदी या आंदोलनात सहभागी झाले होते .







