जळगाव ( प्रतिनिधी ) – भाजपा जिल्हा उद्योग आघाडीच्यावतीने जिंदा भवन येथे कोरोना लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एमआयडीसी परिसरातील ४०० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

एमआयडीसी परिसरातील नागरिकांसाठीं मंगळवार व बुधवारीही लसीकरण सुरू राहणार आहे. नागरिकांनी अधिकाधिक संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे, उद्योग आघाडीचे अध्यक्ष संतोष इंगळे, नगरसेवक किरण खडके, नगरसेविका रंजना वानखेडे यांनी केले आहे.
याप्रसंगी शहर उपाध्यक्ष प्रदीप रोटे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील, अयोध्यानगर मंडल अध्यक्ष विजय वानखेडे, सरचिटणीस किसन मराठे, युवा मोर्चा सरचिटणीस अक्षय जेजुरकर, उद्योजक भारतीचे समीर साने, उद्योजक रवी लड्डा, विनोद बियाणी, अरुण बोरोले, समीर चौधरी, बबलू भोळे, सुनील सुखवानी, शैलेश काबरा, राजू वाघ, वामन महाजन आदी उपस्थित होते. हर्षल इंगळे यांचे सहकार्य लाभले.







