यावल ( प्रतिनिधी ) – दहीगाव येथील तीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात २५ वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली होती. आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

दहिगाव राहणारा कैलास प्रल्हाद पाटील (वय-२५) याने दारूच्या नशेत शुक्रवारी दुपारी भाडेकरू म्हणुन राहात असलेल्या शेतमजुर यांच्या साडेतीन वर्षाच्या मुलीला १० रुपये देण्याचे आमीष दाखवुन घरात नेले व अत्याचार केले. बालिकेची आई कामावरून घरी आल्यावर तिला समजल्यावर हा प्रकार लक्षात आला. संतप्त आईने घरमालकाच्या मुलाच्या कानशिलात लगावली असता त्याने घटनास्थळाहून पळ काढला. पिडीत मुलीच्या आईने शनिवारी यावल पोलीसात तक्रार दाखल केल्यावर संशयीत आरोपी कैलास पाटील यास पोलीसांनी अटक केली. आज भुसावळ न्यायालयात हजर केले असता न्या.एस .पी. डोरले यांनी आरोपीस दोन दिवसाची १२ ऑक्टोबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली.







