जळगाव ( प्रतिनिधी ) –पॉलिशच्या बहाण्याने विवाहितेच्या हातातील चांदीच्या पाटल्या काढून घेत चोरण्याच्या प्रयत्नात पळून जाण्याचा प्रयत्न करणाराला पकडून ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे
या संदर्भात धानवड येथील रहिवाशी भटू राठोड यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , ते आज नेहमीप्रमाणे सेंट्रिंगच्या कामावर गेले होते तेंव्हा त्यांना चेतन चव्हाण या मित्राचा फोन आला की , माझ्या पत्नीच्या चांदीच्या पाटल्या चोरून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला पकडण्यात आले आहे घरी गेल्यावर भटू राठोड यांना त्यांच्या पत्नी वैशाली राठोड यांनी सांगितले की , घरी आलेल्या अनोळखी माणसाने त्यांना त्यांच्या हातातील पाटल्या पोलिश करून देतो असे सांगितले . मात्र पाटल्या काढून त्याच्याकडे देताना त्यांना शंका आली आणि त्यांनी आरडाओरड केली ते ऐकून तो पळून जाण्याच्या प्रयत्नात होता मात्र त्याला हेमंत पाटील , चंद्रकांत आवारे , गजानन चव्हाण यांनी पकडले . त्याची चौकशी केल्यावर त्याने नाव आणि पत्ता सांगितला या फिर्यादीवरु त्याच्याविरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .