चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील अष्टभुजा व्यापारी संकुलातील नवकार ड्रायफ्रुट नावाच्या दुकानातील २ हजार १०० रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार उघडकीला आला अज्ञात चोरट्यांविरोधात चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
हुकुमचंद चांदमल खाबिया (वय-६० , रा. हनुमान वाडी, नवकार बंगला, स्टेशन रोड) यांचे शहरातील अष्टभुजा व्यापारी संकुलात नवकार ड्रायफ्रूट्स नावाचे दुकान आहे. ७ ऑक्टोबर रात्री ९ ते ८ ऑक्टोबर सकाळी ६ वाजेच्या दरम्यान बंद दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी २ हजार १०० रुपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार सकाळी उघडकीला आल्याने हुकुमचंद खाबिया यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पो हेकॉ राहुल सोनवणे करीत आहेत.