पाचोरा ( प्रतिनिधी ) – रेल्वेस्थानकाजवळ लावलेल्या दुचाकीलाच्या पिशवीतून १ लाख रुपये रोकड लांबविण्याचा प्रयत्नात असलेल्या एकाला अटक केली आहे. पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीराम आनंद चौधरी (वय-६७ ,रा. परधाडे ) हे दुचाकीने रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या आंबेडकर पुतळ्याजवळ शुक्रवारी दुपारी आले होते. त्याठिकाणी संशयित आरोपी नाना देवराज शिंदे (वय-२० रा. गणपत गड सोलापूर ) याने दुचाकीजवळ येऊन पिशवतील १ लाख रुपयांची रोकड लांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र हा प्रयत्न श्रीराम चौधरी यांनी हाणून पाडला. आरोपी नाना शिंदे यांला पाचोरा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोहेकॉ यशवंत घोडसे करीत आहे.