पारोळा (प्रतिनिधी) – तालुक्यातील वंजारी खुर्द येथील नियमित वीज पुरवठ्यासाठी ११ ऑक्टोबरपासून कुटुंबांसह बेमुदत उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे .

ग्रामस्थानी तहसीलदार अनिल गवांदे, पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पी एन पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की महिन्याभरापासुन वंजारी खुर्द गावाचा विज पुरवठा अखंड राहिलेला नाहीय , त्यामुळे पंखे, फ्रिज, लाईट आदी उपकरणे जळतात, दररोज रात्री तास दिड तास विजपुरवठा सुरू राहतो नंतर रात्रभर विजपुरवठा बंद असतो कधी-कधी रात्र दिवस विजपुरवठा बंदच राहत असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत, वंजारी गावाचा विज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा ग्रामस्थ ११ ऑक्टोबरपासून पासुन महावितरण कार्यालयासमोर बायका पोरं, गुर-ढोरांसह आमरण उपोषण करणार आहेत
यावेळी सरपंच जितेंद्र पाटील, उपसरपंच वनमाला पवार, बाळासाहेब पाटील, रमेश चौधरी, धनसिंग पाटील, धनसिंग पाटील, बापू पाटील, पांडुरंग पाटील, प्रकाश पाटील, देवेंद्र पाटील, रविंद्र पाटील, सुनील पाटील, पुंजू पाटील, प्रवीण पाटील, समाधान पाटील, जितेंद्र पाटील, राजेंद्र पाटील , उखर्डू भिल, प्रदीप पाटील , विजय पाटील, महेंद्र पाटील , सुरेश पाटील , सुभाष पाटील, संजय पाटील, राजेंद्र पाटील, रोशन पाटील , वामन पाटील, रामभाऊ पाटील , अनिल पाटील , शालीक भिल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.







