पुणे ( वृत्तसंस्था ) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात प्रसिद्ध केली होती. 290 पदांसाठी 16 संवर्गात भरती होणार होती. आता एमपीएससीकडून 100 पदं वाढल्यामुळं 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 ला राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल.

. आज एमपीएससीनं नवीन परिपत्रक काढत 20 संवर्गात 390 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. क्लास 1 ( गट अ च्या ) 100 जागा वाढल्याने उमेदवारांमध्ये आनंदाच वातावरण आहे.राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.अर्ज दाखल करण्याचा अंतिम 25 ऑक्टोबर आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 544 तर मागासवर्गीय उमेदावारंसाठी 344 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
उपजजिल्हाधिकारी 12, पोलीस उपअधीक्षक 16, सहकार कर आयुक्त 16 , गटविकास अधिकारी 15, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ 15, उद्योग उप संचालक 4, सहायक कामगार आयुक्त 22, उपशिक्षणाधिकारी 25, कक्ष अधिकारी 39, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी 4, सहायक गटविकास अधिकारी 17, सहायक निबंधक सहकारी संस्था 18, उपअधीक्षक भूमि अभिलेख 15 , उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क 1, सहकारी कामगार अधिकारी 54, मुख्याधिकारी गट ब 75, मुख्याधिकारी गट अ 15 पदं, उपनिबंधक सहकारी संस्था गट अ 10 पदांसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.







