• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळच्या स्टेट बँकेला १ कोटी ४९ लाखात लुबाडले ! : १७ आरोपींवर गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 8, 2021
in क्राईम, जळगाव
0

भुसावळ ( प्रतिनिधी ) – येथील स्टेट बँकेच्या आनंदनगर शाखेला लुबाडून तब्बल १ कोटी ४९ लाख ११ हजार रूपयांची बोगस कर्जे लाटणार्‍या १७ जणांच्या विरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

बनावट कागदपत्रे, दुसर्‍यांची बांधलेली घरे दाखवून स्टेट बँकेच्या भुसावळ शहरातील आनंद नगर शाखेतून १ कोटी ४९ लाख २१ हजार रूपयांचे कर्ज लाटण्यात आले. बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. या आरोपींमध्ये कर्जदारांसह बँकेच्या व्हॅल्युअरचा समावेश आहे. कर्ज वाटपात फसवणूक करताना बँकेच्या अधिकृत व्हॅल्यूअरची भूमिका प्रमुख राहिल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले. आरोपींनी कर्जदाराच्या मिळकतीचे बाजार भावापेक्षा अधिक मूल्यांकन दाखवणे, मिळकतीवर घर वा इमला नसताना तो बांधल्याचे दर्शवून वाढीव किंमतीचे मूल्यांकन करणे, खोट्या सौदे पावतीच्या आधारे कर्ज लाटल्याची बाब बँकेने केलेल्या चौकशीत स्पष्ट झाली.

२३ मार्च २०१८ ते १६ जून २०१९ दरम्यान स्टेट बँकेच्या आनंद नगर शाखेत व्यवस्थापक म्हणून विशाल इंगळे, तर १७ जून २०१९ ते २८ डिसेंबर २० दरम्यान नंदलाल बाबूलाल पाटील हे व्यवस्थापक होते. उभयंतांच्या कार्यकाळात बँकेची फसवणूक झाल्याच्या तक्रारीनंतर जळगावचे मुख्य प्रबंधक सुरेश सोनवणे यांच्यामार्फत चौकशी झाली. त्यात बँकेची १ कोटी ४९ लाख २१ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. या अनुषंगाने स्टेट बँकेचे व्यवस्थापक मनोज बेलेकर यांनी गुरुवारी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला.

मनोज बेलेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आसीफ गवळी (द्वारका नगर, भुसावळ), माजिद खान (भुसावळ), नीलेश सपकाळे (बुद्धवाडा, कन्हाळा), पंकज देशमुख (पंचशील नगर, भुसावळ), राजेश मेहरे (गोरक्षण संस्था, जामनेर रोड, भुसावळ), शाह शकीर (मुस्लिम कॉलनी, खडका रोड, भुसावळ), शशिकांत अहिरे (फुलगाव, ता.भुसावळ), शकील गवळी (कन्हाळे बुद्रूक, ता.भुसावळ), शोभा पगारे (यावल रोड, राहुल नगर, भुसावळ), संदीप मैराळे (खडका, ता.भुसावळ), संतोष सूर्यवंशी (रामदासवाडी, खडका रोड, भुसावळ), अफसानाबानो खान (द्वारका नगर, भुसावळ), गजानन शिंपी (नेब कॉलनी, भुसावळ), शाह अरबाज (पंचशील नगर, भुसावळ), बँकेचे व्हॅल्युअर समीर बेले (दुसरा मजला, रयल हब बिल्डिंग, जिल्हा न्यायालय जवळ, मालेगाव) या कर्जदारांसह बँकेचे व्हॅल्युअर अशोक दहाड (रा. नवी पेठ, एमजी रोड टॉवरजवळ, जळगाव), कमलाबाई बोरसे (पीओएच कॉलनी, भुसावळ) यांच्याविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


 

 

Previous Post

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे कायदेविषयक मार्गदर्शन

Next Post

तरूणाला चौघांकडून मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तरूणाला चौघांकडून मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम
1xbet russia

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 17, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
1xbet russia

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

June 17, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन
1xbet russia

गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन

June 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 17, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon