जळगाव ( प्रतिनिधी ) – कोरोना काळानंतर राज्य शासनाने नवरात्रोत्सवात राज्यातील सर्व मंदीरे उघडण्यास परवानगी दिल्याने आज गोलाणी मार्केटजवळील हनुमान मंदीराजवळ भाजपाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

दीड वर्षांपासून कोरोनामुळे देशातील सर्व धार्मीक स्थळे बंद होती. सध्या देशासह राज्यात कोरोना रूग्ण संख्या नगन्य असल्याने शाळा, महाविद्यालये व इतर सार्वजनिक ठिकाणे उघडण्यास परवानगी देण्यात आली. धार्मिक स्थळे उघडण्यासाठी भाजपा आणि वारकरी मंडळींनी वेळोवेळी आंदोलने केली होती. पाठपुराव्याला यश आल्यानंतर आज भाजपातर्फे आनंदोत्सव साजरा करून पेढे वाटप करण्यात आले . यावेळी आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, स्वप्निल पाटील, मनोज भांडारकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







