जळगाव ( प्रतिनिधी ) – ट्रकमध्ये ११ बैलांना निर्दयीपणे कोंबून बेकायदेशीर वाहतूक करणारे ट्रक मालक व चालक यांना एमआयडीसी पोलीसांनी उमाळा फाट्याजवळून रात्री १० वाजता अटक केली दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

औरंगाबाद रोडवरून ट्रकमध्ये ११ बैल निर्दयीपणे कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पो नि प्रताप शिकारे यांना मिळाली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथकाने बुधवारी रात्री उमाळा फाट्याजवळ ट्रक क्रमांक (एमएच ४६ एएफ ५५५४) ची तपासणी केली . त्यात निर्दयीपणे कोंबून विनापरवाना ११ बैल कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती मिळाली. ३ लाख ३० हजार रूपये किंमतीच्या या ११ बैलांची सुटका करण्यात आली. १ लाख रूपये किंमतीचा ट्रक एमआयडीसी पोलीसांनी जप्त केला आहे. ट्रकचालक आसिफ उस्मान समा (वय-३०, रा. मेहरूण) आणि मालक तन्वीर शेख सुपडू (वय-२३ , रा. मास्टर कॉलनी) यांना अटक केली समाधान पाटील ( रा. कांचन नगर ) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, रविंद्र चौधरी, जितेंद्र राजपूत, पो ना गणेश शिरसाळे, पो.कॉ. गोविंदा पाटील यांनी केली.







