चोपडा ( प्रतिनिधी ) – येथे आज प्रियांका गांधी यांच्या बेकायदा अटकेच्या निषेधार्थ चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटजवळ शहर व तालुका काँग्रेसतर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जात असताना योगी सरकारने त्यांना बेकायदेशीर ताब्यात घेतले. या अटकेच्या व लखीमपुर येथे अमानुषपणे शेतकऱ्यांची हत्या झाल्याच्या निषेधार्थ चोपडा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संदीप पाटील यांचे नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले .आंदोलनात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
.चोपडा शहर काँग्रेसचे अध्यक्ष के. डी. चौधरी, उपाध्यक्ष सय्यद, प्रदीप पाटील,, एड एस. डी . पाटील , नंदकिशोर सांगोरे, राजेंद्र पाटील, कांतीलाल सनेर, किरण सोनवणे, चेतन बाविस्कर ,मधुकर बाविस्कर, तात्यासाहेब शिंदे , रमाकांत सोनवणे, इलियास पटेल , देवकांत चौधरी, प्रा शैलेश वाघ ,प्रा संदीप पाटील , मुक्तार सय्यद , रोहन पाटील, अशोक साळुंखे, देवानंद शिंदे, अरिफ शेख ,प्रदीप चौधरी, धनंजय पाटील , सोहन सोनवणे , डॉ अशोक कदम , प्रमोद पाटील , भिका पाटील, शशिकांत साळुंखे, एकनाथ शिंदे आदी कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला







