जामनेर ( प्रतिनिधी ) – नगरपालिकेच्या पाणी पुरवठा समिती सभापतीपदी अतिश झाल्टे तर दिवाबत्ती समिती सभापतीपदी बाबुराव हिवराळे . स्वच्छता वैद्यकीय व सार्वजनिक सभापतीपदी मणियार सुरय्याबि मुनाफ , नियोजन व विकास समिती सभापतीपदी शेख रशीद बाबी अमिनुद्दिन , महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी शेख बतुलबी यासीन यांची बिनविरोध निवड आज करण्यात आली

नवीन सभापतीनिवडीसाठी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या अध्यक्षतेखालील मंगळवारी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला उपनगराध्यक्ष शरद पाटील , गटनेते डॉ प्रशांत भोंडे , मुख्याधिकरी चंद्रकांत भोसले यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते पिठासिन अधिकारी म्हणून तहसीलदार अरुण शेवाळे यांनी कामकाज पाहिले नवनियुक्त सभापतीचे आमदार गिरिश महाजन , भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर व भाजप पदाधिकऱ्यांनी अभिनंदन केले.







