पाचोरा (प्रतिनिधी) – उत्तर प्रदेशातील लखीमपुरमधील शेतकर्यांना चिरडले गेल्याने त्यांच्या परीवाराचे सांत्वन करण्यासाठी जात असताना कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली होती या अटकेच्या निषेधार्थ पाचोऱ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली.

शेतकर्यांच्या जीवावर उठणारे तीन काळे कायदे रद्द करण्यात यावे म्हणून उत्तर प्रदेशच्या लखीमपुर येथे शेतकर्यांनी आंदोलन केले होते या आंदोलनात केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलाने चार शेतकर्यांना चिरडले शहीद झालेल्या शेतकरी परीवाराला सांत्वन भेट देण्यासाठी कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी जात असतानांच त्यांना अटक करण्यात आली योगी सरकार विरोधात पाचोरा कॉंग्रेसने तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने केली.
निदर्शनात अनेक घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणला होता यावेळी शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण यांच्यासह तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, जिल्हा युवक उपाध्यक्ष अॅड. अंबादास गिरी, युवक विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, जिल्हा अल्पसंख्याक सचिव इरफान मनियार, महिला जिल्हा सरचिटणीस संगीता नेवे, तालुकाध्यक्षा अॅड मनिषा पवार, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष शरीफ शेख, नाना पाटील, शंकर सोनवणे, शंकर धमाले, अनिल धमाले, योगेश धमाले, संतोष पाटील, शंकर महाजन, आबा महाले, रवी ठाकुर, अनिल भोई, भुषण पाटील आदींनी जोरदार घोषणाबाजी करीत प्रांताधिकारी अधिकारी कार्यालयात निवेदन दिले.






