एरंडोल (प्रतिनिधी ) – कासोदा येथील भारती विद्या मंदिर शाळेत संजीवन व्यसनमुक्ती केंद्र ( एरंडोल) यांच्या संयुक्त विद्यमाने २ ते ८ ऑक्टोंबर दरम्यान व्यसनमुक्ती जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
या व्यसनमुक्ती सप्ताहात आज “नशा करी दुर्दशा” हे पथनाट्य सादर करण्यात आले. सामाजिक न्याय मंत्रालय , समाज कल्याण अधिकारी व संजीवन व्यसनमुक्ती केंद्र ( एरंडोल) व भारती विद्या मंदिर (कासोदा ) यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती जनजागरण सप्ताहअंतर्गत विनोद ढगे यांचे “नशा करी दुर्दशा” या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.
उदघाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमोद पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून राहुल मराठे,सागर शेलार, शैलेश मंत्री, नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष रोहिदास पाटील, प्रकल्प संचालक राजेंद्र ठाकरे, सचिव संजय बागड, भारती विद्या मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना चौधरी, कुलदीप पवार, एम.एस.पाटील, रविंद्र सोनवणे, नारायण शिरसागर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रवीण मराठे यांनी केले, तर राजेंद्र ठाकरे यांनी आभार मानले.