जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आज महापालिका कर्मचाऱ्यांसाठी कायदेविषयक योजनांचे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
विधी सेवा प्राधिकरणातर्फे नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या योजनांची माहिती या शिबिरात देण्यात आली. या शिबिराच्या उदघाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.एन.खडसे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त गोसावी, जिल्हा सरकारी अभियोक्ता एड केतन डहाके हे उपस्थित होते .
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अँड. ए. ए. के. शेख, अध्यक्ष दिलीप बोरसे, अँड.निलेश चौधरी ,अँड. विजय दर्जी यांनी विविध कायद्यांबद्दल मार्गदर्शन केले. विधी सेवा प्राधिकरणाच्या योजना महापालिका कर्मचारी सामान्य जनतेपर्यंत कसे पोहचवू शकतात. या विषयावर चर्चासत्रांचेही आयोजन करण्यात आले होते. १५० महापालिका कर्मचारी या शिबिरात सहभागी झाले होते .
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी एस एस मणियार विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, निलेश बारी, दीपक सोनवणे, मनीष चव्हाण, सागर पाटील, माईसाहेब पाटील, डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी , महापालिका कर्मचारी मनोज शर्मा , विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक रवींद्र ठाकूर, अविनाश कुलकर्णी, प्रमोद पाटील, प्रकाश काजळे, चन्द्रवदन भारंबे, गणेश निंबोळकर आदींनी सहकार्य केले .