फैजपूर ( प्रतिनिधी ) – धनाजी नाना महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दत्तक गाव कळमोदा येथे कवयित्री बहिणाबाई ग्राम वाचन कट्ट्याचे उद्घाटन धनंजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन करून त्यांनी ग्रामविकासाबरोबर वाचन संस्कृती समृद्धीसाठी वाचनकट्टा स्थापन करणे चांगला उपक्रम आहे. ‘खेड्याकडे चला ‘हा महात्मा गांधी यांनीं दिलेला मंत्र स्वातंत्र्यानंतर अमलात आला असता तर आज खेड्यांची स्थिती प्रगतीशील असती असे सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळमोदाच्या सरपंच सरला पाटील होत्या. त्यांनी या उपक्रमासाठी धनाजी नाना राष्ट्रीय सेवा योजना विभागाला सहकार्य करू असे आश्वासन दिले. प्रास्ताविक व स्वागत कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी करताना वाचन कट्टा आयोजनामागील भूमिका कथन केली. राष्ट्रीय सेवा योजनेत दत्तक गावाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आरोग्यविषयक विविध समस्यांवर स्वयंसेवकांद्वारे काम केले जाते. दत्तक गावाचा सर्वांगीण विकास व्हावा व गावाच्या विकासात प्रगतीत प्रत्येक गावकरी यांचा हातभार लागावा यासाठी नागरिकांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच ग्राम वाचन कट्टा स्थापन करावा असा विद्यापीठाचा मानस आहे.
वाचनकट्टा नियंत्रण समिती अध्यक्षपदी सरपंच सरला पाटील आहेत. प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी उपाध्यक्ष व रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक सूर्यवंशी कोषाध्यक्ष असतील ग्रामपंचायत सदस्य विलास पाटील-सचिव आहेत अंगणवाडी सेविका सहसचिव आहेत , ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील हे या नियंत्रण समितीचे सदस्य आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सरला तडवी यांनी केले. आभार प्रा. शेरसिंग पाडवी यांनी मानले.