नगरदेवळा ( प्रतिनिधी ) – येथे झालेल्या ग्रामसभेत भ्रष्टाचार, मिळत नसलेल्या सुविधा या विविध विषयांवर ग्रामविकास अधिकारी, सरपंच व ग्रामस्थ यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याने ग्रामसभा वादळी ठरली.
सरपंच प्रतीक्षा काटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत खर्चाचे वाचन ग्रामविकास अधिकारी यांनी केले. त्यानंतर तंटामुक्ती समिती अध्यक्ष व सदस्यांची निवड करण्यात आली., १४ व्या वित्त आयोगामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला १५ लाख रुपयांची जलवाहिनी अपूर्ण असून बिले कशी काढण्यात आली. १४ व १५ वित्त आयोगामध्ये झालेली कामे नित्कृष्ट दर्जेची झालेली आहेत त्या कामांची चौकशी व्हावी, तसा ठराव करण्यात यावा अशी मागणी माजी पसरपंच नामदेव पाटील, विलास पाटील यांनी केली.
ग्रामनिधी मधून १५% निधी अपंगांना वाटप करण्याचा शासननिर्णय असतांना 2013 पासून वाटप झाला नसल्याने त्वरित वाटप करावा असे अनिल पाटील यांनी सांगितले शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांना होत नसल्याने गावात दवंडी देण्यात यावी, लसीकरणात राजकारण करीत असल्याने वैद्यकीय अधिकारी विरेंद्र पाटील यांची बदली करण्यात यावी, कोणत्याही सोयी मिळत नसतांना घरपट्टी पाणीपट्टीची केलेली कर आकारणी रद्द करावी, कार्यालयात नियमित नसल्याने व मुख्यालयी हजर राहत नाहीत म्हणून ग्रामविकास अधिकारी संतोष शिवणेकर याची बदली व्हावी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करावे, मुबलक पाणीसाठा असतांना आठ दिवसात पिण्याचे पाणी का मिळते? राष्ट्रीय पेयजल योजनेची चौकशी व्हावी, रोजगार हमी योजनेत खऱ्या लाभार्त्यांचा समावेश व्हावा, घरबांधकामसाठी बैलगाडीने वाळू उचलण्यास परवानगी मिळावी, गडद नदीपात्रातील वाळूचा निलाव करावा या विषयांवर उहापोह होऊन तसे ठराव ग्रामसभेत करण्यात आले.
संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या मनमानी कारभाराला कडाडून विरोध केला. ग्रामसभेला माजी सरपंच अरुण काटकर, डॉ. योगेश बसेर, सिद्धार्थ पवार, सागर पाटील, शैलेंद्र परदेशी, किरण काटकर, सुभाष कोकंदे, अभिजित पवार, संजय भोई, उमेश लढे, भूपाल पवार, नारायण पाटील, धनराज चौधरी, रज्जाक शेख, भैया महाजन, सुनील तावडे, सचिन गढरी, सुनील राऊळ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, पत्रकार, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.