मुंबई ( प्रतिनिधी ) – आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांनी मनस्ताप व्यक्त केला होता. आज दुपारी 3 तास बैठक झाली त्यामध्ये 24 ऑक्टोबर गच क ची तर गट ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली

राजेश टोपे यांनी यावेळी 9 दिवस आधी हॉलतिकीट दिले जाईल, अशी देखील माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका कुठलेही चुकीचे काम होऊ देणार नाही, असं म्हटलं.चुकीच्या गैर मार्गाचा अवलंब होणार नाही, असं काही असेल तर तातडीने पोलिसात तक्रार नोंदवा, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं.
न्यासा ही संस्था आरोग्य विभागाने ठरवली नव्हती, माहिती तंत्रज्ञान विभागाने 5 एजन्सी निवडल्या आहेत. त्यानुसार ही एजन्सी काम करत होती, असं राजेश टोपे म्हणाले.
ऑडिओ क्लिप कुणी बनवली त्यात तथ्य आहे का.? अशा कुठल्याही बाबतीत पोलीस ठाण्यात तक्रार द्याव्यात ही मी विनंती करत आहे, असं राजेश टोपे म्हणाले. आम्हाला नावे कळले तर आम्ही तक्रार देऊ, आम्ही अमरावती आणि पुणे एसपी ला पत्र देऊन कळवलं आहे, असंही राजेश टोपे म्हणाले.







