नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – चीनने पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ आपल्या क्षेत्रामध्ये ५० हजारहून अधिक सैनिक तैनात केले आहेत.

भारत चीनदरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनच्या हालचाली पुन्हा वाढल्या आहेत. भारतामधील सुरक्षा चौक्यांवर चीन ड्रोन्सच्या सहाय्याने नजर ठेवत असल्याची माहितीही समोर आलीय. चीन मोठ्या प्रमाणात ड्रोन्सचा वापर करुन भारतीय सीमेमधील घडामोडींवर नजर ठेऊन असल्याचं वृत्त आहे.
चिनी लष्कराकडून दौलत बेग ओल्डी सेक्टर, गोगरा हाइट्स आणि या परिसराच्या आजूबाजूच्या क्षेत्रांवर नजर ठेवली जात आहे. चीनच्या ड्रोन्सवर भारत बारकाईने नजर ठेऊन आहे. भारताकडून वेगवेगळ्या माध्यमातून चीनच्या या हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे.







