जळगाव ( प्रतिनिधी ) – कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील भाजीपाला मार्केट येथून भाजीपाला विक्रेत्याचे २६ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविंद्र सोनार (वय-४९, रा. भादली बुद्रुक) भाजीपाला विक्रीचे काम करतात. २५ सप्टेंबररोजी सकाळी ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केट येथे भाजी खरेदीसाठी आले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांचा १० हजार रुपये किमतीचा मोबाईल तर सोबत असलेले दोन सहकाऱ्यांचे १६ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असे एकूण २६ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल चोरून नेले रवींद्र सोनार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला . पुढील तपास पो ना इम्रान सय्यद करीत आहे.







