जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील ओमकारनगर परिसरातून खाजगी नोकरी करणाऱ्या व्यक्तीची १२ हजार रुपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नरेंद्रकुमार बोरसे (वय-४१, रा. विश्राम नगर ) येथे राहतात. २० सप्टेंबर रोजी दुपारी ते शहरातील ओमकारनगर येथे कामाच्या निमित्ताने आले होते. त्यांनी त्यांची मोटरसायकल माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्या घरासमोर लावली. अज्ञात चोरट्याने त्यांची मोटारसायकल चोरून नेल्याचे उघडकीला आले. नरेन्द्र कुमार बोरसे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला . पुढील तपास पो ना भरत चव्हाण करीत आहेत.







