जळगाव ( प्रतिनिधी ) — युवासेना कोअर कमिटी सदस्य व मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्या शीतल देवरुखकर- शेठ दोन दिवसाच्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून शुक्रवार व शनिवारी जळगावात थांबणार आहेत.
युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर महाराष्ट्रस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन युवासेना व शिवसेनेतर्फे रायसोनी महाविद्यालय येथे करण्यात आले असून स्पर्धेचे उदघाटन व बक्षिस वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे मुलं व मुलींचे १० संघ सहभागी होणार असून स्पर्धेला जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सहकार्य लाभणार आहे.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, हर्षल माने, महिला जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, महापौर जयश्री महाजन, माजी महापौर नितीन लद्धा, उपमहापौर कुलभूषण पाटील, शोभा चौधरी, युवासेना विस्तारक अजिंक्य चुंभळे, धनश्री कोळगे, रायसोनी महाविद्यालयाचे प्रीतम रायसोनी, डॉ प्रीती अग्रवाल उपस्थित राहणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवासेना जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील, शिवसैनिक विराज कावडीया, अमित जगताप, स्वप्नील परदेशी, प्रीतम शिंदे, पियुष हसवाल, भूषण सोनवणे, संस्कृती नेवे, नेहल मोडक, सयाजी जाधव, दिनेश पाटील परिश्रम घेत आहे.दोन दिवसाच्या दौऱ्यात युवासेनेच्या पदाधिकारी व युवा सैनिकांशी शीतल शेठ संघटनवाढीच्या व विद्यापीठ कारभाराविषयी चर्चा करणार आहेत .







