जळगाव ( प्रतिनिधी )— शहरातील इच्छा देवी चौक ते शिरसोली नाका या मुख्य रस्त्यावरील आणि या भागातील अतिक्रमणे हटवण्यास स्थानिक रहिवाशांनी विरोध केला असून आम्हाला दिलेल्या तोंडी सूचना तात्काळ रद्द कराव्यात अशी मागणी महापालिकेकडे केली आहे
महापालिका अधिकाऱ्यांकडून काल इच्छा देवी चौक ते शिरसोली नाका या मुख्य रस्त्यावरील आणि या भागातील रहिवाशांना आणि दुकानदारांना तोंडी सूचना देत सांगितले की , गटारींपासून आतल्या भागात ७ फुटांपर्यंत घरांची आणि दुकानांची अतिक्रमणे संबंधितांनी स्वतःहून काढून घ्यावीत अन्यथा महापालिकेकडून अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात येईल
शहरातील या प्रभाग क्रमांक १५ मधील रहिवाशांचे म्हणणे आहे की , आम्ही येथे जवळपास ६० वर्षांपासून राहतो आहे घरपट्टीही भरतो हा रास्ता १८ मीटर्सचा आहे शहरात सगळीकडे अतिक्रमणे असताना फक्त या भागातील रहिवाशानाच त्रास का ? महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम खाते यांच्यातील वादात आमचे मरण का ? सध्या पावसाळा आणि पुढे दसरा दिवाळी असे सण आहेत याचा प्रशासनाने विचार करावा आणि ही अतिक्रमणे हटविण्याची भूमिका सोडून द्यावी , असेही महापालिकेला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे .