मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) — रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मुक्ताईनगर तालुक्यातील मेळसांगावे, पंचाने येथील युवकांनी आज पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी भाजपात प्रवेश केला.


या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चामध्ये कार्यरत होऊन पक्षाचे विचार तळागाळात पोहचविणे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले
यावेळी भाजयुमो तालुका सरचिटणीसपदी हर्षद (मयुर) महाजन व उमेश भिंगरे, भाजयुमो तालुका सोशल मीडिया संयोजकपदी कल्पेश पाटिल व भाजयुमो तालुका कोषाध्यक्षपदी आकाश ठाकरे यांची नियुक्तीपत्र देऊन नव्याने निवड करण्यात आली.
यावेळी खासदार रक्षा खडसे यांच्यासह भाजपा मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, हर्षद (मयुर) महाजन, उमेश भिंगरे, कल्पेश पाटिल, आकाश ठाकरे, संजय ठाकरे, बबलू पाटील, योगेश तायडे, जितेंद्र ठाकरे, कुंदन ठाकरे, मयुर ठाकरे, पवन ठाकरे, आकाश ठाकरे, ज्ञानेश्वर करे, उमेश भिंगरे, कुणाल तायडे, यशराज पाटील, सुरज पाटील, पवन पाटील, प्रतिक कोळी, गजानन पाटील, पवन ठाकूर, अमोल ठाकरे आदी . उपस्थित होते.







