पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल संवेदनशील भागात पोलिसांचे रॅपिड ऍक्शन फोर्स व स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच होमगार्ड यांचे पथसंचलन रॅपिड ऍक्शन फोर्स कंपनीचे डेप्युटी कमांडंट शशिकांत राय यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
पाचोरा शहरातील संवेदनशील भागाची, मिस्त्र वस्ती व जास्तीत जास्त गणपती स्थापना झालेल्या भागात हे पाठ संचालन करण्यात आले मानसिंग मैदान येथून सुरू झाल्यावर नगरपालिका चौक, हुसेनी चौक, मच्छि बाजार, आठवडे बाजार, सोनार गल्ली, मुल्लावाडा, जामनेर रोड व परत मानसिंग मैदान असा पथसंचालनाचा मार्ग होता पथसंचालनामध्ये रॅपिड ऍक्शन फोर्सचे 1 पोलीस निरीक्षक, 8 पोलीस अधिकारी, 81 कर्मचारी तसेच पो.नि..के. एल नजन पाटील यांचे सह 3 पोलीस अधिकारी, 25 अंमलदार व 40 होमगार्ड सहभागी होते.