शिरसोली (प्रतिनिधी) – येथील शिरसोली-वावडदा दरम्यान रोड लगत नेव्हरे शिवारातील मारोती मंदिरांची दानपेटी फोडताना एका तरुणांला रंगेहाथ पकडून जळगाव एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती असी की शिरसोली-वावडदा दरम्यान नेव्हरे शिवारातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मारुती मंदिराची दानपेटी आज रात्री 11 वाजेच्या सुमारास मध्यप्रदेशातील रहिवासी ह.मु.शिरसोली नेव्हरे शिवारात शेतात काम करणारा जायड्या ऊर्फ शेड्या बारेला वय २४ सह तीन जणांनी. दानपेटी दगडाने फोडताना प्रयत्न केला. वावडदा वरुन शिरसोली कडे येणाऱ्या काही तरुणांनी थाबून हा प्रकार बघितला असता . काय करता आहे असे विचारले तेव्हा ते तीघे चोरटे त्यांच्या माघे काठ्या घेऊन सुटले. तेव्हा ते तरुण गावात शिरसोलीत आले. बस स्टँडवर बसलेल्या काही तरुणांना हा प्रकार सांगितला. लागलीच आठ ते दहा जण मोटारसायकलीने मारोती मंदिरावर गेले असता तिथे शेड्या बारेला दानपेटी दगडाने फोडत असतांना रंगेहाथ आढळला याच्या सोबत असलेले दोन साथीदार मात्र फरार होण्यास यशस्वी झाले. शेड्या बारेला हा दारुचा नशेत असल्याने त्याला शिरसोली गावात आनुन पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांच्या ताब्यात देण्यात आले. बारी यांनी त्याला प्राव्हेट गाडीने जळगाव एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात दिले. याच मारुती मंदिराची दानपेटी याअगोदर ही अज्ञात चोरट्यांकडून फोडण्यात आली आहे. आता सदर ही दानपेटी मजबूत लोखंडाची बनविण्यात आली असुन यामुळे आज चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला. म्हणून रंगेहाथ शेड्या बारेला पकडला गेला. त्याच्या सोबत असेले दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहे.