जळगाव ( प्रतिनिधी ) – विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी “राष्ट्रवादी काँग्रेस रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे” असे महिलांबाबत अपमानास्पद व लज्जास्पद वक्तव्य केले, याचा राष्ट्रवादी महिला आघाडीसह पक्षाच्या सर्व फ्रंटलच्यावतीने निषेध करण्यात आला. निषेधाचे व दरेकरांच्या माफीनाम्याची मागणी करणारे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचे विरोधी पक्षनेते पद सांभाळणाऱ्या व्यक्तीने महिलांबाबत असे वक्तव्य करणे म्हणजे दरेकरांची वैचारिक दरिद्रता दिसून येत आहे, त्यांनी तात्काळ आपले विधान मागे घेऊन महिलांची जाहीर माफी मागावी असे निवेदनात नमूद केले.
यावेळी तालुकाध्यक्ष तथा कृ.उ.बा.स.माजी सभापती निळकंठदादा चौधरी, पं.स. सदस्य योगेशदादा पाटील,शहराध्यक्ष मेहबूब शेख, महिला तालुकाअध्यक्ष मायाताई बारी, युवक तालुकाध्यक्ष सचिनदादा पाटील, ओबीसी सेल तालुकाअध्यक्ष सुनीलदादा कोंडे, पदवीधर सेलचे तालुकाध्यक्ष, युवक जिल्हाउपाध्यक्ष कुणालभाऊ महाले,महिला उपाध्यक्ष्या इंदुताई हिवरे,सचिव कविता गोडसे,यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व महिला कार्यकर्ते उपस्थित होते.