जळगाव ( प्रतिनिधी ) – राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या महाराष्ट्रातील जागेवर काँग्रेस पक्षाने जालन्याचे माजी खासदार व औरंगाबादेतील उद्योजक उत्तमसिंह पवार यांना संधी द्यावी अशी मागणी राजपूत करणी सेनेनं केली आहे

उत्तमसिंह पवार यांनी लोकसभेत खासदार म्हणून उत्तम कारकीर्द निभावली असून राजपूत समाज व ओ बी सी वर्गाकडून उत्तमसिंह पवार यांना राज्यसभेवर घ्यावे अशा आशयाची मागणी खान्देश राजपूत समाज ,श्री राजपूत करणी सेना खान्देश विभाग यांचेकडून होत आहे या पूर्वी राजपूत समाजाचे नेतृत्व उत्तमसिंह पवार यांनी सिद्ध केलेले आहे असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
या मागणीसाठी राजपूत करणीसेना खान्देश विभाग अध्यक्ष प्रविनसिंह पाटील (जळगाव) , विलाससिंह पाटील (कार्याध्यक्ष खान्देश, मुक्ताईनगर) , विठ्ठलसिंह मोरे (जिल्हा प्रमुख जळगाव) , भिमसिंह पाटील (प्रदेश सरचिटणीस नंदुरबार ) , रवींद्रसिंह राजपूत (सम्पर्क प्रमुख नंदुरबार ) , राजेंद्रसिंह राजपुत ( नंदुरबार जिल्हा प्रमुख ) , प्रदीपसिंह गिरासे (धुळे जिल्हा प्रमुख ) , बी एच खंडाळकर (जिल्हा उपाध्यक्ष जळगाव ) , आशिषसिंह हाडा (जिल्हा उपाध्यक्ष जळगाव) , गणेशसिंह राणा ( जिल्हा संघटक जळगांव) , मोहनसिंह पवार (जिल्हा कार्याध्यक्ष चाळीसगाव ) , जळगाव येथील उद्योजक विजयसिंह राजपूत ,संदीपसिंह पाटील , अतुलसिंह पाटील व सर्व राजपूत करणी सेनेचे मुक्ताईनगर , बोदवड , भुसावळ , जामनेर , पाचोरा, चाळीसगाव, जळगाव, धुळे , नंदुरबार तालुकाप्रमुख काँग्रेस पक्षाकडे आग्रह धरणार आहेत . उत्तमसिंह पवार यांनी याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे आग्रह धरलेला आहे.







