जळगाव ( प्रतिनिधी ) – हैदराबादेतील ६ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा द्या आणि तिच्या कुटुंबाला सरकारकडून मदत द्या अशा मागणीचे निवेदन आज गोर सेनेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठवले

हैदराबादेतील सिंगारेनी कॉलोनीतील ६ वर्षीय बालिकेवर नराधमांनी अत्याचार केल्याची घटना घडली होती या आरोपींना अटक करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा , पीडितेच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी आणि कुटुंबाला ५० लाख रुपयांची मदत सरकारने करावी अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत या मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलनाचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे
तेलंगणाचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि हैदराबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही या निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.







