मुंबई ( वृत्तसंस्था ) – आज कृष्णकुंज निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बेळगांव महानगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवक रवि साळुंखे व त्यांच्या सहका-यांनी भेट घेतली. राज ठाकरे यांनी नगरसेवक रवी साळुंखे यांचा सत्कार केला, त्यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे उपस्थित होते.

बेळगाव महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने पूर्ण बहुमत मिळवून सत्ता हस्तगत केली आहे या निवडणुकीत भाजपने महाराष्ट्र एकीकरण समितीचा २५ वर्षांपासूनचा प्रभाव निकाली काढल्याचे सांगितले जात आहे अशा परिस्थितीत बेळगाव महापालिकेत मनसेचा नगरसेवक निवडून येणे महत्वाचे समजले जात आहे बेळगावच्या राजकारणात महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी मदतीची भूमिका घेऊन शिवसेना सुद्धा आपला प्रभाव वाढवण्याचे प्रयत्न करीत असताना मनसेने मिळवलेले हे यश लक्षणीय समजले जात आहे







