जळगाव ( प्रतिनिधी ) – वाघूर नदीच्या पात्रात धरणाच्या पाण्याचा विसर्ग सोडला जाऊ शकतो म्हणून वाघूर धरणाखालील नदीकाठच्या गावानी सावधानता बाळगावी, असा इशारा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिला आहे.

वाघूर धरणाची जलपातळी आज दुपारी तीन वाजता 233.79 मीटर झाली आहे. पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने धरणाची पातळी सातत्याने वाढत आहे. येत्या 24 तासांत जलसाठा पूर्ण होण्याची शक्यता असल्याने धरणातून वाघूर नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सोडला जाऊ शकतो वाघूर धरणाखालील नदीकाठच्या गावानी सावधानता बाळगावी, असा इशारा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिला आहे. नदीपात्रामध्ये गुरेढोरे सोडू नये अथवा प्रवेश करू नये, असेही कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.







