रावेर ( प्रतिनिधी ) – रावेरात पोलिस निरिक्षक कैलास नागरे नव्याने रुजु होऊन काही दिवसच झाले आहेत अशातच अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील पन्नास हजार रुपये रोख चोरुन त्यांना सलामी दिली आहे. रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील शिक्षक कॉलोनीतील रहिवाशी नयना फत्तू तडवी बाहेरगावी गेल्याने त्यांचे घर बंद होते ३ ते ११ सप्टेंबर दरम्यान अज्ञात चोरटयाने बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील पन्नास हजार रुपये रोख चोरन नेले याबाबत नयना फत्तू तडवी यांनी रावेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्या वरुन ४५४/४५७/३८० प्रमाणे अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिस निरिक्षक कैलास नागरे यांचा मार्गदरशनाखाली पी एस आय सोनवणे तपास करीत आहेत.







