जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील इकरा शिक्षण संस्था संचालित एच जे थीम महाविद्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक संस्थांसाठीच्या क्रीडा योजनाविषयी माहितीकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अब्दुल करीम सालार होते.प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित , एम के पाटील , अरविंद खांडेकर, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ इकबाल शाह, सचिव एजाज अब्दुल गफार मलीक, डॉ. ताहेर, अब्दुल अजीज सालार, डॉ. जबिउल्ला शाह उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ कुराण पठणाने प्रा. डॉ.अख्तर शाह यांनी केला .सुत्र संचालन प्रा. डॉ. वकार शेख यांनी केले. प्रास्ताविक प्रा.डॉ. चांदखा यांनी केले .
जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी क्रीडा अनुदानास पात्र कोण होऊ शकतो? प्रस्ताव कसे सादर करावे? याबद्दल माहिती दिली. एम के पाटील यांनी क्रीडा अनुदानासाठी लागणारे प्रस्तावबद्दल मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ सय्यद शजाअत अली यांनी मार्गदर्शन केले. मिर्झा इकबाल, रहीम रजा सर, अब्दुल रहीम सर, हनीफ खान सर, यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली
डॉ अब्दुल सालार म्हणाले की, क्रीडा अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न करावे, प्रस्ताव सादर करावे.. यावेळी जिल्ह्यातील प्राथमिक शाळा व विद्यालय संस्था चालक, मुख्याध्यापक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशसवीतेसाठी प्रा. पिंजारी, डॉ.युसुफ पटेल, डॉ अमीन काझी, डॉ.इरफान, डॉ राजेश भामरे, डॉ. तनवीर खान, प्रा. आसिफ खान ( क्रीडा संचालक गोदावरी कॉलेज जळगांव ) यांनी परिश्रम घेतले. आभार प्रर्शन प्रा. साजिद मलक यांनी केले.







